Satara: जिल्ह्यामध्ये फलटण व महाबळेश्वर वगळता झालेल्या इतर आठ नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात सरासरी 66.59 टक्के मतदान झाले. सातारा पालिकेत सर्वात कमी 58.54 तर मेढा नगरपंचायतीत सर्वाधिक 84.23 टक्के मतदान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने रात्री उशिरा याबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 9 वर्षानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकांची सातारा जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता होती. महायुतीमध्ये असणाऱ्या घटक पक्षांमध्येच विशेषता भारतीय जनता पक्ष व शिंदे गट शिवसेना यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने सुद्धा साताऱ्यात लढत देण्याचा जोरदार प्रयत्न झाला. सातारा पालिकेमध्ये मतदारांचा निरुत्साह दिसून आला. एक लाख 48 हजार मतदारांपैकी केवळ 86 हजार 812 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 44 हजार 742 पुरुष तर 42 हजार 56 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. मेढा नगरपंचायतीमध्ये 84.23 टक्के मतदान झाले आहे. मलकापूर नगरपंचायतीमध्ये 15,770 मतदारांपैकी 12,806 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे 81.20 टक्के मतदान झाले. त्यानंतर पाचगणी नगरपालिकेमध्ये 77.33 टक्के मतदान झाले आहे. एकूण ३ लाख 24, 835 मतदारांपैकी जिल्ह्यात २ लाख 18 हजार 699 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सातारा जिल्ह्यामध्ये सरासरी 66.59 टक्के मतदान झाल्याने राजकीय उत्सुकता काही ठिकाणी जाणवली तर काही ठिकाणी प्रचंड निरुत्साह जाणवला आहे. निकाल लांबणीवर पडल्याने धाकधूक वाढली सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी केली होती .शेवटच्या टप्प्यामध्ये शिंदे गटाने सुद्धा साताऱ्यात 17 उमेदवार देऊन आणि जिल्हा 127 उमेदवारांच्या माध्यमातून कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला .महायुतीमध्ये विशेषता मतदानाच्या दिवशी साताऱ्यात शिंदे गटविरुद्ध भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये विशेषत: सातारा शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा असून त्यामुळे उमेदवारांची धाकधूक प्रचंड वाढली आहे. नाराजांची रसद अपक्षांना तसेच कमळ चिन्हावर असणाऱ्या उमेदवारांना मतदारांच्या नाराजीचा फटका बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अर्थात या चर्चांचा खरा अंदाज निकालाच्या दिवशीच येणार आहे. मात्र, खुल्या जागांवर इतर प्रवर्गाची झालेलीया अतिक्रमणामुळे दुखावलेला ओबीसी वर्ग तसेच भारतीय जनता पक्षाची अग्रेसर रणनीती यामुळे संधी न मिळालेल्या नाराजांची रसद अपक्ष आणि महाविकास आघाडीच्या पारड्यात गेल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीची साताऱ्यात तातडीची बैठक नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेमध्ये एकूण 9 उमेदवार होते. यामध्ये खरी लढत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णाताई पाटील व महायुतीचे भाजपचे उमेदवार अमोल मोहिते यांच्यात खरी लढत होणार आहे. साताऱ्यामध्ये तुतारी की कमळ या चर्चेमध्ये साताऱ्यात नाराजांनी तुतारी वाजवल्याची चर्चा असल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात सर्व उमेदवारांची बैठक बोलावली आणि एकूण झालेले मतदान, कोपरा सभांना मिळालेला प्रतिसाद याबाबत राजकीय गणिते मांडली जात आहेत. शशिकांत शिंदे यांनी सर्व उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतली व सुवर्णाताई पाटील यांच्याशी चर्चा केली. झालेल्या मतदानाची टक्केवारी पाचगणी 77.45, सातारा 58.54, मलकापूर 68.5, म्हसवड 79.85, वाई ७२.९८, कराड 69.91, रहिमतपूर 81.20, मेढा ८४.२३,