world snake day 2022 : पाइपच्या माध्यमातून बाथरूममध्ये घुसला खतरनाक किंग कोब्रा अन्… पहा व्हिडिओ

सुरत – साप हा या जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. साप समोर आला तर मोठ्या सुरमांची अवस्था कृश होते. सापांमध्ये अजगर आणि किंग कोब्रा या प्रजाती सर्वात धोकादायक आहेत. ते अनेकदा जंगलात किंवा स्नॅक हाउसमध्ये दिसतात. कधी-कधी ते घराभोवतीही दिसतात. कधी कधी ग्रामीण भागातील घरांमध्ये साप बाहेर हमखास दिसून येतात. यानंतर त्यांना पकडण्यासाठी साप पकडणाऱ्याला पाचारण केले जाते.अशावेळी एकच गोंधळ उडतो.
अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एक धोकादायक किंग कोब्रा टॉयलेट सीटच्या वाटीतून बाहेर पडताना दिसत आहे. खरंतर हा किंग कोब्रा बाथरूमच्या पाईपच्या मदतीने टॉयलेटमध्ये घुसतो. किंग कोब्रा बाथरूम पाइपच्या माध्यमातून टॉयलेट सीटमध्ये घुसल्याचं सांगण्यात येत आहे. आता टॉयलेट सीटमध्येच किंग कोब्रा दिसल्यावर परिवाराची भंबेरी उडाली. त्यांना पाइपचं तोडं बाहेरून बंद केलं. त्यानंतर सर्पमित्राला बोलवण्यात आलं.
जेव्हा सर्प पकडणारे येतात तेव्हा ते घटनेचा संपूर्ण व्हिडिओ बनवतात. व्हिडीओमध्ये दिसत आहे की,’प्रथम शौचालयात पाणी टाकले जाते, ज्यामुळे पाईपमधून साप बाहेर येऊ शकेल. काही वेळाने सापही पाईपमधून बाहेर येतो, पण लोकांना पाहताच तो पुन्हा आत जातो. यानंतर तो टॉयलेट सीटच्या बाउलपर्यंत पोहोचतो. यानंतर, तो क्षणार्धात टॉयलेट सीटमधून बाहेर येतो. या दरम्यान, किंग कोब्रा ज्या प्रकारची फणा मारतो.’ या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या घटनेचा व्हिडिओ सर्पमित्र आकाश जाधव या यूट्यूब चॅनलवर आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील ग्रामीण भागातील आहे. सर्प रेस्क्यू टीमला अनेक प्रयत्नांनंतर सापाला बाहेर काढण्यात यश आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1.7 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.





