पुणे जिल्हा | त्रिशा देवकर यांच्या बैलगाड्याला सरपंच केसरीचा मान

भोर, (प्रतिनिधी) – भोलावडे (ता. भोर) येथील सरपंच ग्रुपतर्फे आयोजित केलेल्या सरपंच केसरी २०२४ बैलगाडा शर्यतीत त्रिशा देवकर, नवनाथ रसाळ यांच्या आई एकवीरा प्रसन्न मावळ बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावीत सरपंच केसरीचा मानकरी घेतला. या शर्यतीत १६० बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदविला होता. नवलाई मंदिरासमोर शिंदेमळा रामबाग रस्ता येथे पार पडलेल्या स्पर्धेत अनुक्रमे एक लाख, ७५ हजार, ५० हजार, ४० हजार, ३० हजार, २० हजार, १० हजार आणि मानाच्या दोन ढाली, असे पहिल्या सात क्रमांकासाठी बक्षिसे होती.
शर्यतीप्रसंगी यशवंत डाळ, जीवन कोंडे, कुलदीप कोंडे, नितीन थोपटे, संदीप शेटे, संतोष घोरपडे, दत्तात्रेय जगदाळे, मोहन आवाळे, बाळासाहेब गावडे, दिलीप आवाळे, शशिकांत जगदाळे, धर्मा आवाळे, सरपंच प्रवीण जगदाळे, गणेश आवाळे, अविनाश आवाळे,राहुल कुंभार, प्रशांत पडवळ, बंडा तारु, गजानन आवाळे आदी उपस्थित होते.
शर्यतीचे समालोचन प्रवीण घाटे, मयूर तळेकर यांनी केले. झेंडापंच प्रसाद शिंदे, निकाल पंच माऊली शिंदे होते. अक्षय आवाळे, ओम आवाळे, समीर जाधव, मनोज पडवळ, सुट्टी पंच राजेंद्र आवाळे, सुरेश जगदाळे, आदित्य आवाळे, हरीश खोपडे, ओंकार आवाळे यांनी मैदानाचे काम पहिले. आझाद तरुण मंडळ भोलावडे, गणेश नगर, बुवासाहेब वाडी यांनी आयोजन केले होते.
द्वितीय क्रमांक हवेलीच्या जाब्या सूर्या ग्रुप किवळे, तृतीय भोर येथील बाळा शेटे एन बी ग्रुप, चतुर्थ क्रमांक कानिफनाथ प्रसन्न मनस्वी ओमकार साबळे, पाचवा क्रमांक आई एकवीरा प्रसन्न निशा संदीप देवकर एकवीरा मावळ, सहावा क्रमांक अवधूत ऋषिकेश बदक, सर्वज्ञा अमोल गायकवाड वडकी यांनी पटकाविला. तर सातवा क्रमांक कुमार मल्हार ग्रुप, अमोल जाधव शिरवळ यांनी मिळवला.





