Sargun Mehta Post : “गेल्या दोन वर्षांपासून प्रेग्नंसी सुरूच…”; अफवा पसरवणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली
Sargun Mehta Post : अभिनेत्री सरगुन मेहताने शनिवारी इन्स्टाग्रामवरील एका पोस्टद्वारे गरोदर असणाऱ्या अफवांना पूर्णविराम दिला.

Sargun Mehta Post : सोशल मीडियावर अनेकदा सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणताही आधार नसलेल्या अफवा पसरवल्या जातात, ज्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्यावर परिणाम होतो. असेच काही काळापासून टीव्ही अभिनेत्री सरगुन मेहता आणि त्यांचे पती रवी दुबी यांच्याबाबत घडत आहे.
अलिकडेच रवी दुबे आणि सरगुन मेहता लवकरच आई-बाबा होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दोघींनीही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसताना सातत्याने यावर चर्चा सुरू आहेत. मात्र यावर आता सरगुनने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
सरगुनने शनिवारी इन्स्टाग्रामवरील एका पोस्टद्वारे गरोदर असणाऱ्या अफवांना पूर्णविराम दिला. सरगुन मेहताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत प्रेग्नंसीच्या अफवांना फेटाळलं. त्याचसोबत अशा निराधार अफवा न पसरवण्याचा सल्ला दिला आहे. Sargun Mehta Post :
सरगुनने पोस्टमध्ये काय लिहिले?
‘तुम्हाला त्या प्रेग्नंसीबद्दल कसं समजलं ज्याबद्दल मला आणि रवीलाच अजून माहीत नाही? आता पुरे झालं…प्लीज असं वाटतंय वृत्तांना आमच्याही आधी आमच्या प्रेग्नंसीबद्दल समजलं होतं, जी प्रेग्नंसी गेल्या दोन वर्षांपासून सुरूच आहे. त्यांच्या मते मी गरोदर आहे. ही तर सर्वाधिक काळ चाललेली प्रेग्नंसी असेल.
View this post on Instagram
कृपया शांत राहा आणि कोणताही आधार नसलेल्या बातम्या पसरवणे थांबवा. कोणतीही बातमी पसरवण्यापूर्वी आमच्याशी किंवा आमच्या टीमशी एकदा विचारणे इतके अवघड नाही, जेणेकरून योग्य माहिती समोर येईल,” अशा शब्दांत तिने ट्रोलर्सवर राग व्यक्त केला आहे. Sargun Mehta Post :
सरगुनने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नाराजी व्यक्त करत लिहिले की, ‘ही मुलं कुठे जात आहेत आणि किती लवकर मी त्यांना जन्म देतेय? मी हे प्रश्न विचारायला हवेत का? की गेल्या दोन वर्षांपासून किंवा त्यापेक्षाही अधिक काळापासून प्रेग्नंट आहे? त्यांना माझ्या डॉक्टरांबद्दल माहित आहे का? सलून किंवा कॅफे जाणंही हल्ली प्रेग्नंसीचं लक्षण मानलं जातंय का?’ असे सवाल तिने उपस्थित केले आहेत. Sargun Mehta Post :
हेही वाचा:





