सरस्वतीचा मारेकरी मनोज ‘Sex Addict’; ‘डेटिंग ॲप’ आणि पॉर्न व्हिडीओंबाबत पोलिसांचा मोठा खुलासा

Updated On:
सरस्वतीचा मारेकरी मनोज ‘Sex Addict’; ‘डेटिंग ॲप’ आणि पॉर्न व्हिडीओंबाबत पोलिसांचा मोठा खुलासा

मुंबई : ठाण्यातील मीरा रोड येथील गीता नगर परिसरातील हत्या कांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे, या हत्याकांडातील आरोपी मनोज सानेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, मनोजने त्याची  लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची हत्या केली आणि नंतर मृतदेहाचे छोटे तुकडे करून ते कुत्र्यांना खाऊ घातले. पोलिसांना परिसरातील लोकांनी कळवताच स्थानिक पोलिसांनी तपास सुरु केला आणि मनोजला अटक केली. अशात आरोपी मनोजला  १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत पोलीस चौकशीदरम्यान मनोज सानेने पोलिसांना पहिल्यांदा सांगितले,’तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे आणि त्याचे सरस्वतीसोबत कधीही शारीरिक संबंध नव्हते. तो पुढे म्हणाला की सरस्वतीशी संबंध नसण्याचे आणखी एक कारण म्हणजे ती त्यांच्या मुलीसारखी होती.’ मात्र आता पोलिसानांच्या हाती नवी माहिती समोर येत आहे.

पोलिसाना तपासात आढळले की,’सरस्वती वैद्यची हत्या करणारा आरोपी मनोज साने अनेक डेटिंग ॲपवर  सक्रिय होता. तो अपच्या माध्यमातून अनेक मुलींशी बोलायचा.. हे सरस्वतीला जेव्हा कळले त्या दिवसांपासून यांच्यात भांडण सुरु झाले. हे भांडण दिवसेंदिवस वाढत गेले, आणि या भांडणातूनच सरस्वतीची हत्या झाली. असावी असा  प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

मात्र आरोपी सानेने सरस्वतीची नेमकी हत्या कशी केली? याचा तपास आता पोलीस करत आहेत. मनोज साने हा सेक्सच्या आहारी (सेक्स अॅडिक्ट) होता. तो सतत अश्लील संकेतस्थळावर सक्रीय होता, असेही तपासात आढळले आहे.

‘हॅजल’, ‘ओके क्युपिड’ अशा ‘डेटिंग ॲप्स’वर आरोपी मनोज साने सक्रिय होता. मनोज साने हा सेक्सच्या आहारी गेला होता. तो सतत अश्लील संकेतस्थळांना भेटी देत असायचा. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लील छायाचित्रे सेव्ह केल्याचेही आढळून आले आहे.

दरम्यान, सरस्वतीने आत्महत्या केल्याचा साने याचा दावा पोलिसांना मान्य नाही. मनोज साने यानेच तिची हत्या केली आहे. मात्र नेमकी हत्या कशी केली याचा आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली.

साने यांनी सरस्वतीची कीटकनाशक देऊन हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. घटनेपूर्वी त्याने बोरिवलीच्या पश्चिम उपनगरातील एका दुकानातून कीटकनाशक विकत घेतल्याचा आरोप आहे. हा खून ४ जून रोजी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेसंदर्भात मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी 20 हून अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत. 

आणखी संबंधित बातम्या

Death penalty : चेहऱ्यावर चिंता, आवाजात कंप; फाशीची शिक्षा ऐकण्यापूर्वी मुस्कान-साहिलने न्यायालयात काय सांगितले?

2026-10-14 18:48:30

Death penalty : चेहऱ्यावर चिंता, आवाजात कंप; फाशीची शिक्षा ऐकण्यापूर्वी मुस्कान-साहिलने न्यायालयात काय सांगितले?

Navratri Festival : पुण्यात अष्टलक्ष्मीची भव्य रथयात्रा! पुष्पवृष्टी आणि भंडाऱ्याच्या उधळणीत देवीभक्तांचा उत्साह

2026-10-14 18:09:13

Navratri Festival : पुण्यात अष्टलक्ष्मीची भव्य रथयात्रा! पुष्पवृष्टी आणि भंडाऱ्याच्या उधळणीत देवीभक्तांचा उत्साह

Pune Crime : सिंहगड रोड पोलिसांची गुन्हेगारांवर कारवाई; एकाला एमपीडीए, तर दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

2026-10-14 17:19:08

Pune Crime : सिंहगड रोड पोलिसांची गुन्हेगारांवर कारवाई; एकाला एमपीडीए, तर दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ५ हजार खात्यात जमा होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

2026-10-14 13:31:26

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ५ हजार खात्यात जमा होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

Ashutosh Ranka & Saurabh Das : रांका, दास यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल

2026-10-13 22:24:50

Ashutosh Ranka & Saurabh Das : रांका, दास यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल