‘Animal’ सिनेमात सारा अली खान साकारणार होती ‘भाभी-2’ उर्फ तृप्ती डिमरीची भूमिका

Animal : अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर स्टारर ‘अॅनिमल’ ( Animal )’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि रश्मिकाची केमिस्ट्री आणि रोमँटिक सीन लोकांना खूप आवडले. त्याचबरोबर अभिनेत्याचा तृप्ती डिमरी (Tripti Dimri) सोबतचा इंटिमेट सीनही चर्चेत आला आहे.
यामध्ये तृप्ती रणबीरसोबत अतिशय बोल्ड सीन्स देऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्री तृप्ती डिमरी ( Tripti Dimri ) आणि रणबीर कपूरचा रोमान्स लोकांना चांगलाच आवडला असून, या चित्रपटानंतर लोकांना अभिनेत्रीचे वेड लागले आहे. या सिनेमात रणबीर कपूरच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारलेल्या तृप्तीला ‘भाभी-2’ म्हणून सोशल मीडियावर ओळखलं जात आहे.
पण तुम्हाला माहितीये का, या चित्रपटात रणबीर सोबत असे इंटिमेट सीन देण्यासाठी बॉलिवूडच्या एका सुपरस्टारच्या मुलीनं ऑडिशन दिलं होतं. पण काही कारणांमुळे तिला रिजेक्ट करण्यात आलं. त्यानंतर तृप्तीची निवड करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅनिमल या चित्रपटात भाभी-2 म्हणजेत तृप्ती डिमरीनं साकारलेल्या जोया या भूमिकेसाठी सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री ‘सारा अली खान’नं ( Sara Ali Khan ) ऑडिशन दिलं होतं. सारा ही भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक होती, पण संदीप रेड्डी वांगा यांना शंका होती की इतके हॉट सीन्स असलेले इंटिमेंट सीन्स करू शकेल का? त्यामुळे त्यांनी सारा ऐवजी तृप्तीची निवड करण्यात आली.
दरम्यान, तृप्ती डिमरीच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्री गेल्या 6 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तिने 2017 मध्ये ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. याशिवाय तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तिच्या अभिनय कौशल्याचा प्रसार केला आहे. अभिनेत्रीने नेटफ्लिक्सच्या ‘काला’, ‘बुलबुल’ आणि ‘लैला मजनू’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.





