‘कोण म्हणेल ही नवाबची मुलगी’; सारा अली खानने चक्क बांद्राच्या रस्त्यावर केली खरेदी; VIDEO व्हायरल

मुंबई – सारा अली खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. कमी काळातच तिने सिनेक्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. तिच्या साध्या राहणीमानामुळे ती अनेकांचे लक्ष वेधून घेत असते. अभिनेता सैफ अली खानची लेक असूनही ती साधे राहणीमान जगण्यास अधिक पसंती देते. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती मैत्रिणींसोबत चक्क रस्त्यावरील दुकानांमध्ये खरेदी करताना दिसून आली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये सारा मुंबईतील बांद्रा परिसरात रस्त्यावर दुकानातून खरेदी करताना दिसते. विशेष म्हणजे यावेळी सारा अली खान हिच्यासोबत कोणताही सुरक्षारक्षक दिसत नाही, तर ती मैत्रिणींसोबत खरेदी करताना दिसते. साराचा हा व्हिडिओ पाहून अनेकजण तिचे कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘बॉलिवूडच्या सर्वच स्टार किड्सने सारा अली खान हिच्याकडून नक्कीच काही गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत.’ तर आणखी एकाने लिहिले की, ‘कोण म्हणेल ही नवाबची मुलगी आहे, बिनधास्तपणे कोठेही सुरक्षारक्षक शिवाय फिरताना दिसते.’
View this post on Instagram
याआधी साराचा रिक्षामधून प्रवास केल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच एका मुलाखतीत साराने ती खूप जास्त कंजूष असल्याचे देखील सांगितले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशलचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या दोघांनी खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटातील दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती.





