sara ali khan : साराने समुद्रकिनारी चमकदार गाऊनमध्ये दिल्या मादक पोज; फोटो पाहून चाहतेही झाले घायाळ

नवी दिल्ली – सैफ अली खान आणि अमृता सिंगची कन्या अभिनेत्री ‘सारा अली खान’ सध्या नवोदित नायिकांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. तिच्या चित्रपटामुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. चित्रपटातील साराच्या भूमिकेची अनेकांनी प्रशंसा केली आहे. तसेच ती भूमिके शिवाय फिटनेस, फॅशन मुळे कायमच चर्चेत असते. तसेच स्टार किड्सच्या यादीमध्ये सारा अव्वल स्थानावर आहे. सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.
अशातच सध्या फ्रांस येथे सुरु असलेल्या कान्स फेस्टिवलमध्ये सारा सहभागी झाली आहे. यावेळी साराने रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसह व्हॅनिटी फेअर अॅन्युअल कान्स फिल्म फेस्टिव्हल पार्टीलाही हजेरी लावली होती. सारा व्यतिरिक्त, या कार्यक्रमात केटी होम्स, स्टॉर्म रीड, लिओनार्डो डिकॅप्रियो, टोबे मॅग्वायर, द वीकेंड, गुरिंदर चढ्ढा, फ्रीडा पिंटो, नाओमी कॅम्पबेल यांच्यासह इतर अनेक स्टार्स उपस्थित होते.
याप्रसंगी साराने सुंदर चमकदार गाऊन परिधान केला होता. त्या सोबतच डायमंड स्टड कानातले, ब्रेसलेट आणि उंच टाचांचे सॅंडल या लुक मध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत होती. यावेळी तिने समुद्रकिनारी फोटो शूट केले असून तिचे हेच फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केल्याचं दिसून येत आहे.





