सारा अली खानने केली फोटो न काढण्याची विनंती; फोटोग्राफरचे विधान ऐकताच नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

Sara Ali Khan| अभिनेत्री सारा अली खान अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होते. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात सारा अली खानचा फोटो क्लिक करताना एक फोटोग्राफर वादग्रस्त विधान करतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून फोटोग्राफरने केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
व्हायरल व्हिडीओत सारा अली खान पांढरा टॉप आणि काळ्या रंगाची पॅण्ट अशा जीमवेअर लूकमध्ये आपल्या गाडीमधून खाली उतरताना दिसत आहे. ती गाडीमधून खाली उतरल्यानंतर तिला समोर पापाराझी दिसतात. सारा फोटोग्राफर्सला फोटो न काढण्याची विनंती करते.
साराने केलेल्या या विनंतीनंतर एक फोटोग्राफरचे ‘नका क्लिक करु? मग कशासाठी हिरोईन झालीस?’ असे म्हणताना ऐकू येते. फोटोग्राफरचं हे विधान ऐकून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच काहींनी कोणत्याही महिलेशी बोलण्याची ही योग्य पद्धत नसल्याचे म्हंटले आहे. मात्र साराचा हा व्हिडिओ मार्च महिन्यातील असल्याचे म्हंटले जात आहे. दरम्यान, सारासह यापूर्वी अनेक अभिनेत्रीं सुद्धा चुकीच्या पद्धतीने फोटो काढण्यावरुन आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाले. Sara Ali Khan|
हेही वाचा:
आज शेअर बाजार अन् बँका बंद ; कमोडिटी आणि चलन बाजारातही सुट्टी आहे का? जाणून घ्या





