अंबानींच्या गणेशोत्सवात सारा अली खानची हजेरी; ‘या’ कृतीमुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Sara Ali Khan Trolled | उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी अत्यंत भव्य पद्धतीने गणपती बाप्पाचं स्वागत केलं. अंबानींच्या घरातील बाप्पाच्या दर्शनासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
यावेळी अभिनेत्री सारा अली खानने देखील हजेरी लावली होती. तिने भाऊ इब्राहिम अली खानसोबत एन्ट्री केली. अंबानींच्या कार्यक्रमाला सारा आणि इब्राहिमसोबतच करीना कपूर आणि सैफ अली खानसुद्धा पोहोचले होते. मात्र एका गोष्टीमुळे साराला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. Sara Ali Khan Trolled |
View this post on Instagram
सारा अली खाननं गोल्डन प्रिंट असलेली मल्टी-कलर्ड लेहेंगा परिधान केला होता. पण फोटोज काढण्यासाठी सारा सारखं तिचं पोट आत घेताना दिसली, त्यावरून लगेच कळतं की पोज देण्यासाठी ती पोट आत घेते. साराच्या या गोष्टीमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. ‘दिखावा करण्याची काय गरजेचं आहे, ‘श्वास थांबवून ठेवलाय का?’ ‘जबरदस्ती सिक्स पॅक दाखवते’, असे म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
तर साराच्या या खास लूकचं काही नेटकऱ्यांनी कौतुकही केलंय. लेहंगा चोलीमध्ये सारा खूपच सुंदर दिसतेय, असं चाहत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सारा अली खानला हिंदू देवी-देवतांवर प्रचंड श्रद्धा आहे. केदारनाथ आणि वैष्णो देवी सारख्या तीर्थक्षेत्रांना ती अनेकदा भेट देताना दिसतात. Sara Ali Khan Trolled |
त्याचबरोबर दरवर्षी सारा गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी करते. यंदा देखील साराच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. साराने इन्स्टाग्राम अकाऊंटवर गणपतीच्या सुंदर मूर्तीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. सारा अली खानने २०१८मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. Sara Ali Khan Trolled |
हेही वाचा :





