‘शकुंतला देवी’ चित्रपटात ‘ही’ अभिनेत्री झळकणार विद्या बालनसोबत

मुंबई – मानवी संगणक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आता या चित्रपटात दंगल फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सान्याने तिचा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या चित्रपटात सान्या अनुपमा बॅनर्जी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी तिचा एक फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. शकुंतला देवी’ बायोपिकच्या शूटिंगला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. अनु मेनन हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.





