फलटण (प्रतिनिधी) – फलटण नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 15000 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले असून, 33 लाख रुपयांचा धनादेश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आला.
फलटण पालिका कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान दिले जाते; परंतु गेल्यावर्षी करोनामुळे हे अनुदान देण्यास विलंब झाला. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रामराजेंचीे धाव घेऊन, सानुग्रह अनुदानासाठी पालिका प्रशासनाला सूचना करण्याची विनंती केली होती.
याबाबत रामराजेंनी आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता झाल्याबद्दल रामराजे व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले. रामराजे यांच्या लक्ष्मीविलास पॅलेस या निवासस्थानी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना धनादेश सुपुर्द करण्यात आला.
रघुनाथराजे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, राहुल निंबाळकर, भाऊ कापसे, दादा चोरमले, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश अहिवळे, खजिनदार सुनील काकडे, सचिव बांद्राबळ गायकवाड, शिवभोला काकडे, सुनील अहिवळे, दिलीप अहिवळे, मनोज मारुडा, सौ. लक्ष्मी काकडे उपस्थित होत्या.