विकी कौशलसोबत संतोष जुवेकरची धमाल-मस्ती; शेअर केला खास व्हिडिओ

Vicky Kaushal and Santosh Juvekar| मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर बॉलीवूड अभिनेता विकी कौशलसोबत ‘छावा’ चित्रपटात झळकणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाच्या सेटवरील विकीसोबतचा मजेशीर व्हिडिओ संतोषने शेअर केला आहे. यासोबतच त्याने ‘छावा’ चित्रपटाचे शूटिंग संपल्याचे सांगितले आहे.
संतोष जुवेकरची पोस्ट
संतोषने शेअर केलेल्या व्हिडिओत संतोष लिहितो की, “Finally माझं shoot संपल. पण शूटिंगचे दिवस आठवणीत राहतील कारण उत्तम कलाकारांची आणि टीमची साथ असेल तर काम बहारदार रंगत आणि मनही कामात रमतं. ह्या क्लिपमधून तुम्हला आम्ही सेटवर केलेल्या मस्तीची कल्पना येईल पण मला खात्री आहे सिनेमाचा पहिला ट्रेलर येईल तेव्हा आम्ही काम करताना काय तोडफोड मेहनत केलीये याची सुद्धा कल्पना येईल.”
“आम्ही कलाकार जेव्हा एखादा नवीन काम करतो तेंव्हा नवीन माणसांची नवीन मित्रांची ओळख होते आणि एक नवीन कुटुंब तयार होत असतं आमच्या आयुष्यात आणि आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात म्हणून माझ्या या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला माझं खूप खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी खूप मोलाची साथ दिलीत.”
View this post on Instagram
संतोष पुढे लिहितो, “लक्ष्मण उतेकर सर तुम्हाला आणि आपल्या direction टीमला आपल्या संपूर्ण @maddockfilms production टीमला, आपले DOP सौरभ सर , बबलू सर, fight director परवेज भाई त्यांची टीम आपले सगळे खाऊपिऊ घालणे डिपार्टमेंट वाले आणि सगळेच तुम्हां सगळ्यांना एक प्यारवाली झप्पी. विकी कोशल पाजी, आशिष, अंकित, शुभांकर, बालाजी सर, प्रदीप सर तुम्हां सगळ्यांना big love u. आपण सर्वांनी केलेल्या आपल्या मेहनतीला आई भवानीचा , छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आणि मायबाप रसिकांचा आशिर्वाद लाभुदे हीच इच्छा आणि प्रार्थना. चलो भेटूयात लवकरच तोपर्यंत….. जय भवानी.”
दरम्यान, ‘छावा’ चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. यात विकी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असून अभिनेत्री रश्मीका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. यात संतोष जुवेकरसोबत शुभंकर एकबोटे आणि आशिष पाथोडे हे कलाकार देखील दिसणार आहेत.
हेही वाचा :





