satara | दुधेबावी येथे आजपासून संत गाडगेबाबा व्याख्यानमाला

फलटण, (प्रतिनिधी) – दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे दुधेबावी ता. फलटण येथे उद्या, दि. 7 ते मंगळवार, दि. 11 या कालावधीत दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता संत गाडगेबाबा व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर आणि व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी दिली.
व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते होणार आहे. अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल अध्यक्षस्थान भूषविणार असून, मुंबईचे प्राप्तिकर अप्पर आयुक्त तुषार मोहिते, सातारचे जिल्हा शल्यचिकित्सिक डॉ. युवराज करपे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राज्य शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, राज्य शिक्षक समितीचे नेते उदयराव शिंदे, अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके, जिल्हा शिक्षक संघाचे नेते बळवंत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता,
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, माजी अधीक्षक अभियंता दिनकरराव सोनवलकर, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाषराव सोनवलकर, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, सरपंच भावना सोनवलकर, उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी (दि. 7) प्रा. रवींद्र कोकरे यांचे ‘संस्काराची शिदोरी’ या विषयावर व्याख्यान होणार असून, फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अध्यक्षस्थानी राहणार आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे फलटण तालुकाध्यक्ष प्रा. रमेश आढाव, विठ्ठलवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बोराटे उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी (दि. 8) विवेकानंद पाटील-माजगावकर यांचे ‘तरुणांनो तारुण्य समजून घ्या’ या विषयावर व्याख्यान होणार असून, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर अध्यक्षस्थानी, तर पत्रकार सुभाष भांबुरे, उजनी धरणाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे उपस्थित राहणार आहेत.
रविवारी (दि. 9) प्रा. वसंतराव हंकारे यांचे ‘बाप समजून घेताना’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर अध्यक्षस्थानी असून, पत्रकार किरण बोळे, मीरा भाईंदरचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सोनवलकर उपस्थित राहणार आहेत.
सोमवारी (दि. 10) अभिनेते समृद्धी जाधव यांचे ‘पोटचा मोड वाया जाऊ नये म्हणून’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले अध्यक्षस्थानी असून, पत्रकार यशवंत खलाटे पाटील, मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक सागर नाळे उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी (दि. 11) ‘चांडाळ चौकडीच्या करामती’फेम रामभाऊ जगताप यांचे ‘जिथे विषय गंभीर…’ या विषयावर व्याख्यान होणार असून, फलटणचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
पत्रकार विकास शिंदे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय दडस उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे, कार्याध्यक्ष संतोष भांड, खजिनदार डॉ. युवराज एकळ, डॉ. सागर कराडे, सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर व सदस्यांनी केले आहे.





