संस्कारी बहु ‘अंकिता लोखंडे’चा बोल्ड अंदाज व्हायरल; फोटो पाहून तुम्ही म्हणाल….

Updated On:
Photo 1

मुंबई – “पवित्र रिश्‍ता’ही मालिका 2009 मध्ये सुरू झाली होती आणि त्या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. या मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत दिसून आले होते. प्रेक्षकांनी देखील या मालिकेला भरभरून प्रेम दिले होते. टेलिव्हिजनच्या दुनियेत ‘पवित्र रिश्‍ता’ या मालिकेने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. याच मालिकेमधून घराघरात पोहचलेली टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री ‘अंकिता लोखंडे’चा आज वाढदिवस आहे.

अंकिताने आपल्या अभिनयानं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज अंकिताच्या वाढदिवशी तिच्यावर खूप साऱ्या शुभेच्छा, प्रेम आणि आशिर्वादचा वर्षाव होतोय. सोशल मीडियावर अंकिताचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे. अंकिता लोखंडे ही टीव्ही जगतातील एक मोठी स्टार आहे. तिच्या अनेक भूमिका लोक आजगी पसंत करतात.

अंकितानं ‘संस्कारी बहु’च्या भूमिका जास्त प्रमाणत केल्या आहेत. त्यामुळे तिच्याकडे संस्कारी बहु म्हणूनच बघितलं जातं. मात्र, खऱ्या आयुष्यात अभिनेत्री अंकिता लोखंडे खूपच बोल्ड आहे. सोशल मीडियावर अंकिता नेहमीच आपले ग्लॅमर्स आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

अंकिताचा बोल्ड अंदाज चाहते पसंत करतात. ते तिच्या फोटोंवर भरभरुन प्रेम देताना दिसतात. नुकतंच अभिनेत्री आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून यामध्ये तिचा हटके आवतर दिसून आला आहे. चाहते देखील तिच्या या हॉट फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. तिचा हा मादक अंदाज सर्वांनाच आवडला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अंकिता लोखंडे आणि तिचा प्रियकर विकी जैन लग्नाच्या बेडीत अडकले आहे. अंकिता-विकी यांचा विवाह मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये अतिशय राजेशाही थाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला अनेक बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच अनेकांनी या नवविवाहित जोडप्याला सोशल मीडियाद्वारे आणि प्रत्यक्ष रित्या शुभेच्छा देखील दिल्या.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र