Sansad Ratna Awards 2026: महाराष्ट्रातील पाच खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान; श्रीकांत शिंदेंसह नरेश म्हस्के यांचा सलग दुसऱ्यांदा गौरव
Sansad Ratna Awards 2026 : भाजपच्या खासदार स्मिता वाघ, खासदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. हेमंत सावरा यांना देखील संसद रत्न पुरस्काराने सन्मानित

Sansad Ratna Awards 2026 : नवी दिल्लीत मोठ्या दिमाखात संसद रत्न पुरस्काराचा सोहळा बुधवारी पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील पाच खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या दोन खासदारांना तर भाजपच्या तीन खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भारत सरकारचे केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री तसेच ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार, भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी. आर. गवई, पुरस्कार ज्युरी समितीचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या विशेष उपस्थितीत यंदाचा मानाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यात शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. तर भाजपच्या खासदार स्मिता वाघ, खासदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. हेमंत सावरा यांना देखील संसद रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
सलग दुसऱ्या वर्षी मानाचा ‘संसद रत्न’ पुरस्कार
ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना सलग दुसऱ्या वर्षी मानाचा ‘संसद रत्न’ पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. संसदेत आपल्या अभ्यासपूर्ण भाषण देणारे खासदार डॉ .श्रीकांत शिंदे यांनाही दुसऱ्यांदा ‘संसद रत्न ‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार दोन्ही खासदारांना प्रदान करण्यात आले आहे.
सलग दुसऱ्या वर्षी देशाच्या सर्वोच्च लोकशाही मंदिरात भारत सरकारचे केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री तसेच ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार, भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी. आर. गवई, पुरस्कार ज्युरी समितीचे अध्यक्ष… pic.twitter.com/1qpRxMRPhb
— Naresh Mhaske (@nareshmhaske) September 9, 2026
याशिवाय चार संसदीय समित्यांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कारही जिंकले आहेत. यामध्ये डॉ चरणजितसिंग चन्नी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखाली वित्त समिती, सप्तगिरी शंकर उलाका यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामीण विकास आणि पंचायती राज समिती आणि कोळसा आणि खाण समिती अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. या पुरस्कार विजेत्यांपैकी जगदंबिका पाल (उत्तर प्रदेश) आणि डॉ. चरणजीत सिंग चन्नी (पंजाब) हे माजी मुख्यमंत्री होते, तर नरहरी अमीन (गुजरात) हे उपमुख्यमंत्री होते.
मागील 15 पुरस्कार सोहळ्यांमध्ये खासदार आणि समित्यांना 143 पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीने दिले जातात. ज्युरी समितीने संसद रत्न पुरस्कार 2026 साठी 10 लोकसभा खासदार, 2 राज्यसभा खासदार आणि 4 संसदीय स्थायी समित्यांची निवड केली होती.
हेही वाचा:






