Sanjog Waghere | विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्काराचा कार्यक्रम पिंपरीत पार पडला. बनसोडे यांचे शहरात आगमन झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांनी देखील हजेरी लावली होती. यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा केल्या जात होत्या. अखेर यावर स्वतः संजोग वाघेरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. चर्चेत कुठलही तथ्य नाही. अण्णा बनसोडे उपाध्यक्ष झाल्याने शुभेच्छा देण्यासाठी मी भक्ती शक्ती शिल्पाजवळ गेल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आगामी पिंपरी- चिंचवड महानगरपालिका निवडणुक स्वबळावर लढणार असल्याचे विधान उद्धव ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे यांनी केल आहे. संजोग वाघेरे हे पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा होत होत्या. त्यांनी अण्णा बनसोडे यांच्या सत्कार समारंभाला हजेरी लावली होती. संजोग वाघेरे म्हणाले, चर्चेत कुठलही तथ्य नाही. अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्ष झाल्याने शुभेच्छा देण्यासाठी मी भक्ती- शक्ती या शिल्पा जवळ गेलो, त्यांना शुभेच्छा दिल्या. ते माझे मित्र आहेत. शहरात एवढं मोठं पद पहिल्यांदाच मिळालं. पद मिळाल्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करायला गेलो होतो. या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही, असे म्हणत त्यांनी चर्चा निरर्थक असल्याचे बोलण्यात सांगितले. आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलेले आहे की आपण स्वबळावरती लढूया. पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेनेची वेगळी ताकद आहे. त्या विचाराचे मतदार आहेत. आगामी महापालिकेला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन समोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगत याबाबत आमची बैठक देखील झाल्याचे त्यांनी सांगितले.