“माय नेम इज अरविंद केजरीवाल अँड आय एम नॉट टेररिस्ट”; तुरुंगातून जनतेसाठी संदेश

Sanjay Singh on Kejriwal । दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीनं अटक केली असून त्यांची रवानगी सध्या तिहार तुरुंगात करण्यात आलीय. गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल तुरुंगातच असून नुकतीच त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपचे खासदार संजय सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून दिलेला संदेश सर्वांना सांगितलंय.
“माय नेम इज अरविंद केजरीवाल” Sanjay Singh on Kejriwal ।
अभिनेता शाहरूख खानच्या चित्रपटातील ‘माय नेम इज खान अँड आय एम नॉट ए टेररिस्ट’ हा संवाद बराच चर्चेत आला होता. तोच संवाद आता अरविंद केजरीवाल यांनी वापरून तुरुंगातून तसाच एक संदेश देशवासीयांसाठी पाठवल्याची माहिती आपचे खासदार संजय सिंह यांनी दिली आहे. “अरविंद केजरीवाल यांनी देशाच्या जनतेसाठी, दिल्लीच्या जनतेसाठी संदेश पाठवला आहे. ‘माझं नाव अरविंद केजरीवाल आहे आणि मी दहशतवादी नाही. माय नेम इज अरविंद केजरीवाल अँड आय एम नॉट ए टेररिस्ट”, असे संजय सिंह म्हणाले.
केजरीवाल यांना दहशतवाद्याप्रमाणे वागणूक Sanjay Singh on Kejriwal ।
पुढे बोलताना संजय सिंह यांनी, “अरविंद केजरीवाल यांना दहशतवाद्याप्रमाणे वागणूक दिली जात आहे. पंतप्रधान त्यांच्या द्वेषामध्ये इतके वहावत गेले आहेत की त्यांच्या पत्नी, मुलांना केजरीवाल यांना काचेच्या आडून भेटू दिलं जात आहे. झेड प्लस सुरक्षा असणाऱ्या पंजाबच्या मु्ख्यमंत्र्यांना दिल्लीचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीची भेट काचेच्या आडून दिली जातेय. यावरून पंतप्रधानांनी हेच दाखवून दिलंय की त्यांच्या मनात अरविंद केजरीवाल यांच्यासाठी द्वेषाची भावना आहे”, असा आरोप त्यांनी केला आहे.
२३ एप्रिलपर्यंत कोठडीत वाढ
२१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत दोन वेळा त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीत पुन्हा एकदा ही वाढ करण्यात आली असून आता २३ एप्रिलपर्यंत केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे.





