संजय राऊत यांचा आरोप,’मिंधे सरकार लवकरात लवकर घालवलं नाही तर महाराष्ट्राचे पाच तुकडे होतील’
Updated On:

मुंबई – कर्नाटककडून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला जात असल्याची चर्चा आहे. या चर्चांवर खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. वृत्त माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले,हे सरकार लवकरात लवकर घालवलं नाही तर महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे राज्याराज्याचे हस्तक राहणार नाहीत, महाराष्ट्रातही भाजपच्या नेतृत्वात मिंधे सरकार आहे. कुणाला मुंबई तोडायची आहे. तर कुणाला महाराष्ट्रातील गावं तोडायची आहेत. अशा तऱ्हेने महाराष्ट्र कुरततडण्याचं काम गेल्या साडेतीन महिन्यांपासून जोरात सुरू आहे.’
‘आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आहेत. त्यांचा हा फक्त बिहार दौरा नाही. राष्ट्रीय दौरा आहे. तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये नितीशकुमार यांच्यासोबत राजकीय परिवर्तन केलं आहे. आम्ही महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन केलं होतं. परत एकदा राजकीय परिवर्तन करण्याच्या तयारीत आहोत.’






