संजय राऊतांनी घेतला बावनकुळेंचा समाचार म्हणाले,’कसाबजी, अफजल गुरुजीही म्हणतील’
Updated On:

मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा केला आहे. त्यावरून आता विरोधकांनी बावनकुळे यांच्यासहीत भाजपला घेरलं आहे. यावरून माध्यमांशी बोलतांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी बावनकुळेंचा समाचार घेतला आहे.
संजय राऊत म्हणाले,’जे पोटात होतं, तेच ओठावर आलं, वादात ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. उद्या ते कसाबजी, अफजल गुरुजीही म्हणतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले,’त्यांच्या पोटात होतं ते ओठावर आलं म्हणूनच त्यांनी औरंगजेबजी असा उल्लेख केला. उद्या कसाबजी म्हणतील. मग अफजल गुरुजी म्हणतील, अफजल खानजी म्हणतील. मग शाहिस्ते खानजी म्हणतील. यावरच त्या पक्षाची रोजीरोटी सुरू आहे.’ असेही ते म्हणाले आहे.





