“कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय..” ‘तो’ व्हिडीओ शेअर करत संजय राऊतांचा CM शिंदेंवर निशाणा

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरळीत कोळी बांधवांनी सत्कार केला. आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात घेत मुख्यमंत्री शिंदेंनी थेट सभा घेत ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सभेचा एक व्हिडीओ ट्विट करत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे शिंदे गटातील आमदारांसह थेट मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याचे आव्हान देत होते. मुख्यमंत्र्यांनी थेट ठाकरेंच्या मतदार संघात सभा घेत त्यांच्या आव्हानाला देखील जोरदार प्रत्युत्तर दिले.मुख्यमंत्र्यांच्या याच सभेचा एक व्हिडीओ संजय राऊत यांनी ट्विट केला आहे.
या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांचे भाषान सुरु असताना अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओवरून आता राजकारण चांगलेच तापू लागले आहे. “मुख्यमंत्र्यांच भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला..कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय..32 वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना?” असे कॅप्शन देत संजय राऊत यांना हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
मुख्यमंत्र्यांच भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. @वरळी
कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला..
कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय..
32 वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना? pic.twitter.com/FoYvWFVTIn— Sanjay Raut (@rautsanjay61) February 7, 2023
मुख्यमंत्र्यांचे आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर
आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन वरळीतून माझ्या विरोधात लढा असं आव्हान मुख्यमंत्र्यांना दिल होत. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले,”मी अशी छोटी नव्हे तर फक्त मोठी आव्हानं स्वीकारतो. अशी आव्हानं स्वीकारतच मी इथपर्यंत आलो आहे. सहा महिन्यांपूर्वी मी असेच एक आव्हान स्वीकारले होते” असं सडेतोड उत्तर शिंदेंनी आपल्या भाषणातून दिले.





