मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये पैशांनी भरलेली बॅग दिसत होती. तसेच शिंदे गटाचे जे चार भ्रष्ट मंत्री आहेत त्यांची एकत्रीत एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या चार नेंत्यांवर एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. संजय राऊत म्हणाले, व्हिडिओ मॉर्फ केला आहे की काय केले हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल, तो व्हिडिओ काय आम्ही काढला आहे का? ओरिजनल पण आहे आणि व्हायरल सुद्धा आहे. त्यावर आता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करेल की, शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत, संजय राठोड यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप भाजपचे नेते परिणय फुके यांनी केलेला आहे. संदिपान भुमरे यांनी दीडशे कोटीची जमीन ड्रायव्हरच्या नावावर केली. मला देखील त्यांचे ड्रायव्हर व्हायला आवडेल, असे अनेक लोक मला सांगत आहेत. संजय शिरसाट, उदय सामंत या मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आले आहेत, त्यांच्यासाठी एकत्रित एसआयटी स्थापन केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.