मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता कंबर कसली असून, पुन्हा एकदा पक्षाची मोट घट्ट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. त्यावर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दीपाली सय्यद म्हणाल्या, “आजची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत पाहिली. यानंतर मी संजय राऊत यांना एवढंच सांगेल की त्यांनी उद्धव ठाकरेंप्रमाणे एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी. त्यांनी ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंची मुलाखत घेऊन त्यांच्या मनातील गोष्टी बाहेर आणल्या, तशीच मुलाखत एकनाथ शिंदेंची घ्यावी. तसं झालं तर एकत्र येऊन काही तरी मध्यस्थीचा मार्ग निघेल.
शासनाचा महत्वपूर्ण निर्णय; प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी
महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्याच स्तरावर गेलंय हे सर्वांनाच माहिती आहे. मी शिवसेनेची कार्यकर्ता, नेता आहे. त्यामुळे यात मध्यस्थी होऊन पुन्हा आमचं घर एकत्र उभं राहावं. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. आजही मी दिल्लीत आहे आणि अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे. यात काही शिवसेनेचे नेते आहेत, तर काही भाजपचे नेते आहेत. सगळ्यांना भेटत आहे, लवकरच काहीना काही निर्णय होईल, अशी आशाही दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली.