बंडाच्या चर्चेनंतर अर्जुन खोतकर यांचा खुलासा; म्हणाले, “संकट असेल तर कोणीही व्यक्ती सेफ होण्याचा प्रयत्न करेल”

नवी दिल्ली – शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेतील खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारीही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना दिसून येत आहे. त्यात आता माजी आमदारही शिंदे गटाकडे वळत आहेत. जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकर हेदेखील शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, सध्या दिल्ली दौऱ्यावर असलेल्या अर्जुन खोतकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून ते शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चांना उधाण आले. ईडीच्या कारवाईमुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र खोतकर यांनी या अफवा असल्याचा खुलासा केला होता. तर अजूनही आपण शिवसेनेत असून, फोटोवर अंदाज बांधू नका, असे ते म्हणाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्या भेटीचा फोटो समोर आला होता. त्यात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हेदेखील दिसून येत आहेत. त्यानंतर मंगळवारी (दि. 26 जुलै) पुन्हा दानवेंची खोतकरांनी भेट घेतली. तब्बल तासभर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. सलग दुसऱ्या दिवशी या दोघांमध्ये चर्चा झाल्याने खोतकर नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, आपण जालन्यात जाऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
माजी आमदार अर्जुन खोतकर म्हणाले, “केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मला चहाचे आमंत्रण दिले होते, त्यामुळे मी त्यांच्या घरी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, माझ्यावर काही संकट असतील तर चेहऱ्यावर तणाव दिसू शकतो, असेही अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
कोणतेही सरकार हे कायम नसते, हे दोन्ही नेत्यांनी समजून घ्यायला हवे – अजित पवार
“संकट असेल तर कोणीही व्यक्ती सेफ होण्याचा प्रयत्न करेल. नाही त्या गोष्टींमध्ये जर अडचणी निर्माण केल्या जात असतील तर तणाव दिसणारच, असेही खोतकर म्हणाले. मी माझ्या निर्णयावर सविस्तर बोलणार आहे. उद्धव ठाकरे हे जर काही बोलत असतील तर त्यांचा तो अधिकार असल्याचेदेखील खोतकर यावेळी म्हणाले. मी जालन्याला गेल्या माझी सविस्तरपणे भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या चेहऱ्यावर तणाव का आहे याची कारणे सर्वांनी माहित असल्याचेदेखील खोतकर म्हणालेत.
“ट्रेलर दणक्यात असतो, पिक्चर डब्यात जातो”; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला





