संजय राऊत म्हणाले,’पंतप्रधानांनी आधी आमच्या दीदींना सुरक्षा द्यावी, नंतर…’

PM Narendra Modi Jalgaon Visit । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी महाराष्ट्रातील जळगाव येथे पोहोचले आहे, जिथे ते महिलांना एक मोठी भेट देणार आहेत. पंतप्रधान 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करत आहेत. महिलांना प्रमाणपत्र देण्यापूर्वी पंतप्रधानांनी महिलांशी संवादही साधला आहे.
लखपती दीदींचा सन्मान करण्यासोबतच, पीएम मोदी 2,500 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करतील, ज्याचा 4.3 लाख बचत गटांच्या सुमारे 48 लाख सदस्यांना फायदा होईल. यासोबतच पीएम मोदी ₹5,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित करतील, ज्यामुळे 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना फायदा होईल.
अशात आता उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले,’मोदी जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आले आहेत. युक्रेन पोलांड रशिया तिकडे देखील भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला गेले होते. जळगावला देखील त्याच कामासाठी आले आहेत. निमित्त आहे, लखपती दिदी ज्या देशात लाखो बेरोजगार आहेत, त्यांना देखील लखपती करण्याची गरज आहे. महिलांना पैसे दिले जातात आणि मुख्यमंत्री विचारत आहेत पैसे मिळाले ना, पैसे मिळाले ना? कुणीतरी महिलेनं आवाज दिला, सरकारच्या बापाच्या पैसे आहेत का? लखपती दीदी आणि जनतेचा पैसा आहे.’ असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले,’प्रधानमंत्री येत आहेत. प्रधानमंत्री फिरत राहतील आणि आमच्या बहिणी न्यायासाठी इकडून तिकडे फिरत राहतील. जागा वाटपासंदर्भात काल महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख पक्षांची बैठक पार पडली. मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे. महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसांचं काय वर्चस्व राहिलं आहे? असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.





