संजय राऊत यांनी उडवली राज ठाकरेंच्या विधानाची खिल्ली म्हणाले,’लोकसभेत लुटणाऱ्यांच्या मागे तेच उभे होते’

Sanjay Raut | विजयादशमीच्या आजच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेला आवाहन केले आहे. यावेळी दसरा म्हटलं आपण सोनं लुटणं, एकमेकांना शुभेच्छा देणं हे आपण दरवर्षी करत असतो. महाराष्ट्राचं सोनं तर गेली अनेक वर्षे लुटलं जात आहे, असं राज ठाकरे म्हणाले. यावरून आता उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले,’राज ठाकरे अगदी बरोबर बोलत आहेत. पण ते लुटणाऱ्यांच्या मागे लोकसभेत उभे राहिले होते. सत्ताधारी लुटण्याचा काम करत आहेत. ते महाराष्ट्र लुटणाऱ्या व्यापाऱ्यांचे मागे उभे राहिले त्यांना ते समर्थन देत आहेत. मुंबई लुटण्याचा काम रावण करत आहेत. या रावणाचे दहन अखेर होईल. महाराष्ट्रात नवीन रावण उभे राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असं संजय राऊत म्हणालेत.
दरम्यान, दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेनेने टिझरचा धडाका लावला आहे. एकापाठोपाठ एक तीन टिझर लाँच केले आहेत. शिवसेनेचे काय होणार असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना शिवसेना काय करू शकते हे दाखवून देईन, असा इशारा या टिझरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. अजित पवारांमुळे पराभव, भगवा रंग फिका पडू देऊ नका, ते शस्त्रपूजा, सोनेवाटप आणि रावण दहन यामुद्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. याच मुद्यांमवरून आज उद्धव ठाकरे भाषणाची सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे.
तत्पूर्वी, दसरा मेळाव्याला होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तीन उपायुक्त, पाच सहाय्यक आयुक्त, 60 अधिकारी व जवळपास 300 कर्मचारी तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवानही सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.
हे वाचाल का ? ‘महाराष्ट्रद्रोही रावणाचे दहन’; उद्धव ठाकरे मेळाव्यात नेमकं काय बोलणार ?





