‘महाराष्ट्रद्रोही रावणाचे दहन’; उद्धव ठाकरे मेळाव्यात नेमकं काय बोलणार ?

Uddhav Thackeray | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज शिवतीर्थ मैदानामध्ये पार पडणार आहे. याची जय्यत तयारी ही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारा हा दसरा मेळावा निश्चितच विराट आणि ऐतिहासिक ठरणार आहे. यंदाचा दसरा मेळाव्या भाषणात उद्धव ठाकरे नेमके कुठल्या मुद्यांवरून सरकारवर टीका करणार यावरून राजकीय तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
दरम्यान, दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेनेने टिझरचा धडाका लावला आहे. एकापाठोपाठ एक तीन टिझर लाँच केले आहेत. शिवसेनेचे काय होणार असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना शिवसेना काय करू शकते हे दाखवून देईन, असा इशारा या टिझरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. अजित पवारांमुळे पराभव, भगवा रंग फिका पडू देऊ नका, ते शस्त्रपूजा, सोनेवाटप आणि रावण दहन यामुद्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. याच मुद्यांमवरून आज उद्धव ठाकरे भाषणाची सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे.
तत्पूर्वी, दसरा मेळाव्याला होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तीन उपायुक्त, पाच सहाय्यक आयुक्त, 60 अधिकारी व जवळपास 300 कर्मचारी तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवानही सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.





