मुंबई – देशामध्ये लोकशाही आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही, हे उद्या कळेल. न्यायव्यवस्था किती दबावाखाली आहे, हे सर्वांना माहीत आहे. कायदेशीर लढाईत शिवसेना कुठेही कमी पडणार नाही. आम्हाला माहीत आहे, न्याय व्यवस्था किती दबावात आहे, पण न्याय होईल, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीका केली.
शंकरराव गडाख सेनेला बाय…बाय…करुन शिंदे सरकारमध्ये सामील होणार?
संजय राऊत म्हणाले की, बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात न्यायालयीन दिलासा कोणाला मिळणार याचा निकाल उद्या 11 जुलै रोजी स्पष्ट होणार आहे. देशामध्ये लोकशाही आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही? हे उद्या कळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
…तर आम्ही मातोश्रीवर जाण्यास तयार, शिंदे गटातील आमदाराचे विधान