“फोन आला अन् एक गाडी सोडली”; कोट्यवधींची रक्कम जप्त प्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर रोख रक्कम घेऊन गाडी राजगड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतली. या गाडीत जवळपास ५ कोटींची रक्कम असल्याचे बोलले जात आहे. ही रक्कम कोणाची? कुठे चालवली होती? आदीबाबत राजगड पोलिसांकडून पडताळणी सुरु आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेली गाडी हिरे शिंदे गटाच्या आमदाराची असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरूनच आता विरोधी गटकसुन सत्ताधारी शिंदे गटावर सडकून टीका करण्यात येत आहे.
गाडीतील पैसे शिंदे गटाच्या आमदाराचे Sanjay Raut ।
पुण्यातील खेड-शिवापूर भागात पोलिसांनी एका गाडीतून पाच कोटींची रोख रक्कम जप्त केले आहेत. ही गाडी एका सत्ताधारी आमदाराची असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. गाडीतील पैसे शिंदे गटाच्या आमदाराचे असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
“फोन आला अन् एक गाडी सोडली” Sanjay Raut ।
जप्त करण्यात आलेल्या रक्कमेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “पुण्यातील खेड-शिवापूर भागात दोन गाड्या होत्या. त्यामध्ये १५ कोटी रुपये होते. तुम्हाला माहिती असेल की, मी आआधी म्हटलं होतं की, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ५०-५० कोटी रुपये देण्याचे काम करत आहेत. त्यातील हा १५ कोटींचा पहिला हप्ता जात होता. जी गाडी पकडली त्यामध्ये सांगोल्याच्या आमदारांसाठी पहिला हप्ता जात होता. त्यामध्ये ५ कोटींचा हिशेब लागला. त्यातील १० कोटी सोडून देण्यात आले. एक फोन आला त्यानंतर एक गाडी सोडून देण्यात आली”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा
“खोकेबाजांना जनता OK करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार’, रोहित पवारांचा हल्लाबोल





