“खोकेबाजांना जनता OK करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार’, रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यात आचारसंहिता लागली असताना पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर रोकड घेऊन जाणारे वाहन राजगड पोलिसांनी सोमवारी (दि.२१) सायंकाळी ताब्यात घेतले.
ही गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याचा दावा केला जात आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत ही गाडी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप केला.
आता आमदार रोहित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. दरम्यान, या वाहनात 5 कोटींची रक्कम असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यादरम्यान रोहित पवार यांनी मोठी रक्कम असलेल्या पैशांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
सोबतच त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगार-झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत?,” असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं
पुढे त्यांनी म्हंटले की, “लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं,” असा इशाराही रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या #डोंगार_झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत?
लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून… pic.twitter.com/B9Z4gbqRk7
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 22, 2024
शहाजीबापू पाटील काय म्हणाले?
या प्रकरणावर शहाजीबापू पाटील म्हणाले की, “तालुक्यात माझे हजारो कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते वेगवेगळ्या स्थरातील आहेत. शिवापूर टोलनाक्यावर एका गाडीत 5 कोटी रुपयांची रक्कम सापडल्याची बातमी मी टीव्हीवरील बातम्यांमधूनच कळालं. ती गाडी माझी किंवा माझ्या कुटूंबातील कुणाचीही नाही,” असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी आपल्यावरील आरोप खोडून काढले.
पुढे त्यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. “संजय राऊतांना त्यांची सत्ता गेल्यापासून आणि आम्ही यशस्वी राजकीय उठाव केल्यापासून रात्री झोपताना झाडं दिसतात, सकाळी उठताना डोंगर दिसतात. सातत्यानं मला फक्त मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे,” असेही शहाजीबापू पाटील म्हणाले.
हेही वाचा:
Gold -Silver Rate । ग्राहकांनो खिशाला लागणार कात्री..! ऐन दिवाळीत ‘चांदी 1 लाखाच्या घरात’





