“भाजपला प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याची सवय ” ; संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका

Sanjay Raut । मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा मोठा सन्मान आहे. बंगाली, मराठी, पाली, प्राकृत आणि आसामी या पाच भाषांना हा सन्मान देण्यात आला आहे. मराठी भाषेला हा सन्मान मिळावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती, ती मागणी आता मान्य झाली आहे”
प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याची भाजपला सवय Sanjay Raut ।
खासदार राऊत पुढे म्हणाले की, “राज्यातील जवळपास सर्वच पक्षांचे नेते, प्रत्येक मुख्यमंत्री आणि प्रत्येक राज्य सरकारने गेल्या 30-35 वर्षांपासून ही मागणी केली आहे. हे घडले असेल तर ते सर्वांचे योगदान आहे, केवळ एका व्यक्तीचे नाही, प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याची भाजपला सवय आहे. त्यांनी (भाजप) उद्योग-व्यवसाय या राज्यातून बाहेर जाणे थांबवावे, मराठी भाषेबरोबरच या राज्याची प्रतिष्ठा वाढली पाहिजे. ” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया Sanjay Raut ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिले की, या जगात मराठी माझी समजली जाते. धन्यवाद पीएम मोदी. माझ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, हे सुवर्णाक्षरांनी लिहावे असा हा दिवस आहे. सर्व मराठी भाषिकांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो. तुमच्या भक्कम पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. महाराष्ट्राची अभिजात दर्जाची मागणी रास्त होती हे आता जगाला समजेल.
#WATCH मुंबई: शिवसेना (UBT) के नेता संजय राउत ने कहा, “यह बहुत बड़ा सम्मान है कि मराठी को शास्त्रीय भाषा का दर्जा दिया गया है। 5 भाषाओं को यह सम्मान दिया गया है- बंगाली, मराठी, पाली, प्राकृत और असमिया। वर्षों से मांग की जा रही थी कि मराठी भाषा को यह सम्मान दिया जाना चाहिए…… pic.twitter.com/y0Kxb5EEzv
— ANI_HindiNews (@AHindinews) October 4, 2024
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सर्व मराठी भाषिकांचे अभिनंदन असे लिहिले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे खूप खूप आभार.
या व्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिले की मराठी ही केवळ समृद्ध साहित्य निर्माण करणारी भाषा नाही तर तिने आपल्याला नेहमीच स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याची प्रेरणा दिली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्यानिमित्त मराठी भाषिक भगिनी आणि बांधवांचे हार्दिक अभिनंदन.
हेही वाचा
हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटील म्हणाले,’जे ठरलं होतं त्याचाच मी व्हाट्सअपला स्टेटस ठेवला..’





