मांजरेकरांचा जडेजा द्वेष कायम
Updated On:

मुंबई -माजी कसोटीपटू व समालोचक संजय मांजरेकर यांचा रवींद्र जडेजाच्या बाबतीतील द्वेष अद्याप कायम असल्याचे समोर आले आहे.
पहिल्या कसोटीत जडेजाला खेळवण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाचा निर्णय आपल्याला रुचला नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
त्यांनी आजवर सातत्याने जडेजावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून देताना जडेजाने अर्धशतकी खेळी केली होती तरीही मांजरेकर यांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन तसूभरही बदललेला नाही.
जडेजाच्या जागी मधल्या फळीत हनुमा विहारी याला स्थान द्यायला हवे होते, असे मत व्यक्त करत मांजरेकर यांनी पुन्हा एकदा जडेजाला लक्ष्य केले आहे.





