संजय गायकवाड पुन्हा आक्रमक; थेट फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ

Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये जेवण चांगले मिळाले नाही म्हणून कॅन्टीन चालकाला मारहाण केली होती. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. त्यांच्या मारहाणीचा प्रकरणानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आमदार गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसत आहे.
बुलढाणाच्या येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील १३ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली होती. ज्यातील आठ विद्यार्थांवर उपचार करून सोडण्यात आले, तर ५ जणांवर उपचार सुरु आहेत. विद्यार्थिनींना विषबाधा झाल्यानंतरही अन्न औषध प्रशासनाने कारवाई न केल्याने आमदार संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
संजय गायकवाड काय म्हणाले?
संजय गायकवाड म्हणाले, ‘ह** फूड अॅण्ड ड्रग्जचे अधिकारी माझा फोन देखील घेत नाहीत. ते गेले सुद्धा नाहीत. जो संस्थाचालक आहे तो या आदिवसाची लेकरांच्या तोंडचा घास हिसकावतोय, त्यांना दूध देत नाही अंडी देत नाही. वरणच्या जागी तेथे फक्त वरणाचं पाणी असतं. प्रत्येक विद्यार्थ्यामागे 21 हजार रुपये यांना महिन्याला मिळतात. 75 लाखांची ग्रँड मिळते. या संस्थाचालकाने येवढी हरामी का कराव?’ Sanjay Gaikwad |
“मी या यासंदर्भात थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली आहे. तसेच कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय आदिवासी विकास खात्याच्या अधिकाऱ्याशी बोलणार आहे. गावात शिक्षण घेऊ शकत नाही म्हणून आदिवासी आश्रम शाळा काढण्यात आल्या. मात्र असे प्रकार होत असतील तर या शाळांचा काय फायदा? मी काही केले तर तुम्हीच मी कायदा हाती घेतला म्हणून सांगाल. मी कायदा हातात का घेतो ते आता या प्रकरणावरून तुम्हाला समजले असेलच,” असा टोला त्यांनी लगावला. Sanjay Gaikwad |
हेही वाचा :
Pawan Singh : मराठी येत नाही, मराठी बोलणार नाही, मला मारलं तरी चालेल : पवन सिंग





