संभाजी भिडे यांचे हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…

सांगली : सतत वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी यावेळी हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान असे वक्तव्य त्यांनी केले आहे. नवरात्रोत्सावानिमित्ताने सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्यावतीने दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी धारकऱ्यांना मार्गदर्न करताना संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केले.
काय म्हणाले संभाजी भिडे?
देशाच्या पाठीवर असंख्य अतिक्रमण झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान आहे. हिंदी-चिनी आणि हिंदी मुस्लिम भाई म्हणाऱ्या हिंदूना शत्रू कोण, वैरी कोण, वाईट कोण,चांगलं कोण,हे कळत नाही. कारण हिंदू महामूर्ख आहे. गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवाचा दांडिया हिंदू समाजाला XXडू बनवत चालला आहे. नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही, असे संभाजी भिडे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्त्व्याने नवा वाद उभा राहाण्याची शक्यता आहे.
नाना पटोलेंनी केली टीका
संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. हिंदूंचा अपमान करण्याचा अधिकार व्यक्तीला नाही अशी टीका करत संभाजी भिडे यांच्यावर काय कारवाई करणार असा सावल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.





