Shirala News : रेड येथील घरातून ३५ लाखांची रक्कम चोरीस
Shirala News : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील रेड येथे एका बंद घरातील लाकडी कपाट फोडून तब्बल ३५ लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Shirala News : रेड (ता. शिराळा) येथील महादेव बाबुराव जाधव (वय ५४) यांच्या घरातील लाकडी कपाटात ठेवलेली ३५ लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आज मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. ही घटना गुरुवार संध्याकाळी सहा ते मंगळवार सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. (Shirala News)
याबाबत माहिती अशी की, महादेव जाधव यांनी जमिनीच्या व्यवहारासाठी घरामध्ये ३५ लाख रुपये आणून लाकडी कपाटात ठेवले होते. मात्र, अचानक त्यांचा मुलगा सचिन याच्या पायाच्या शस्त्रक्रियेसाठी कराड येथे दाखल करण्यात आले. (Shirala News)
त्यामुळे हा जमिनीचा व्यवहार होऊ शकला नाही. सचिन व त्यांची पत्नी शीतल हे दोघे शुक्रवारपासून कराड येथील खाजगी रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. कपाटाची चावी ही पत्नी शीतल या आपल्याबरोबर घेऊन गेल्या होत्या. (Shirala News)
मात्र, या घरात एक मांजर होते. त्याला खायला खाण्यासाठी सचिन यांची मुलगी स्पृहा ही घरात जात होती. त्यामुळे दिवसभर घर उघडे असायचे व रात्री घर बंद केले जात होते. आज मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान स्पृहा ही मांजराला खायला देण्यासाठी गेली असता लाकडी कपाट उघडलेले तसेच साहित्य विस्कटलेले दिसले. याबाबत तिने आजोबा महादेव जाधव यांना याची कल्पना दिली. (Shirala News)
या घटनेची माहिती शिराळा पोलिसांना दिली. तातडीने पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव जाधव आदी घटनास्थळावर दाखल झाले. (Shirala News)
याबाबत पोलिसांचा तपास सुरु झाला असून रात्री उशिरा पर्यंत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे सुरू होते. घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम, ठसे तज्ज्ञ दाखल होऊन संशयास्पद ठसे घेण्यात आले आहेत. (Shirala News)




