Sangli News : वाळवा तहसील कार्यालयाचा कारभार पारदर्शक; सदाभाऊ खोत यांचे स्पष्टीकरण
पूर्वी तहसील, प्रांत कार्यालय आणि पंचायत समितीतील निर्णय कारखान्यावरुन (Sangli News) होत होते. आमदार जयंत पाटील यांचे बगलबच्चे प्रशासकीय निर्णय करुन देत होते. पायचाटू अधिकारी केवळ औपचारिक सही व शिक्क्यापुरते मर्यादित राहिले होते.

Sangli News : पूर्वी तहसील, प्रांत कार्यालय आणि पंचायत समितीतील निर्णय कारखान्यावरुन (Sangli News) होत होते. आमदार जयंत पाटील यांचे बगलबच्चे प्रशासकीय निर्णय करुन देत होते. पायचाटू अधिकारी केवळ औपचारिक सही व शिक्क्यापुरते मर्यादित राहिले होते. आत्ताचे खंबीर अधिकारी त्यांच्या दारात जात नाहीत ही त्यांची शोकांतिका आहे. असा टोला आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
वाळवा तहसील कार्यालयाचा (Sangli News) कारभार पूर्णपणे पारदर्शकपणे सुरू आहे. तहसीलदार सारिका रासकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महसूल विभागातील कामकाजात गती, पारदर्शकता आणि शिस्त आली आहे. अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, भाजपचे प्रसाद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केदार पाटील उपस्थित होते. आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, ‘‘पूर्वीच्या काळात काही अधिकाऱ्यांवर विशिष्ट राजकीय दबाव होता. त्यामुळे विरोधी पक्षातील कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळण्यात अडचणी येत होत्या. मात्र, महायुती सरकारच्या काळात प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि जबाबदार बनले आहे.
वाळवा तालुक्यातील अधिकारी कोणत्याही राजकीय नेत्याच्या दबावाखाली काम करणारे नसून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे महसूल विभागात ‘टेबलावर वजन ठेवल्याशिवाय (Sangli News) काम होत नाही,’ असे आ.जयंत पाटील यांनी केलेले वक्तव्य वस्तुस्थितीला धरून नाही. तहसीलदार सारिका रासकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागातील प्रकरणांचा जलद निपटारा होत आहे. त्यांच्या कामकाजाची पद्धत पारदर्शक आणि परिणामकारक आहे.’’
महसूल विभागातील काही कर्मचारी अनेक वर्षांपासून बस्तान मांडून काम करत आहेत. प्रशासनातील अशा प्रवृत्तींवर सरकार स्तरावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या गैरप्रकारांना यापुढे थारा (Sangli News) दिला जाणार नाही. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार ठामपणे उभे राहील. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही आ. सदाभाऊ खोत यांनी दिला.
आ.जयंत पाटील यांचे आरोप बिनबुडाचे
महसूल विभागातील भ्रष्टाचाराबाबत आ.जयंत पाटील यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांचे दर्शन न घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर आरोप करुन त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु, त्यांना सत्ताबदल झाल्याचे ध्यानात नसावे. आम्ही चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे राहू, अशी ग्वाही आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली.






