Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांच्या वक्तव्याने संताप! आंदोलकांना आतंकवाद्यांची उपमा म्हणाले “केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्र”
Sadabhau Khot : एका कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत यांनी मंचारून जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनावर भाष्य करताना हे वक्तव्य केले.

Sadabhau Khot criticizes the protest at Jantar Mantar : शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी दिल्लीतील आंदोलनावरून केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची तुलना त्यांनी “दहशतवाद्यांशी” केली आहे. “या दहशतवाद्यांना सरकारने लोकशाही मार्गाने उत्तर द्यावे.” असं वक्तव्य सदाभाऊ खोतांनी केलं आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत यांनी मंचारून जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनावर भाष्य करताना हे वक्तव्य केले.
एका कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, “नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे योग्य नाही. पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींना अटक करण्यात आली आहे. सरकार दोषींना सोडणार नाही.” अशी स्पष्ट भूमिका सदाभाऊ खोत यांनी घेतली.
पुढे बोलताना त्यांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीवरही गंभीर आरोप केले. “केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जाणीवपूर्वक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही सोशल मीडिया गट आणि राजकीय पक्ष आंदोलनाला चिथावणी देत असून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.” असा दावा त्यांनी केला.
केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्र : खोत
“इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी दहशतवादासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारने अजिबात घेऊ नये. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्र आहेत,” असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. यानंतर आता त्यांनी केलेल्या दावे आणि आरोपांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
उद्या २२ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असल्याचे देखील सदाभाऊ खोतांनी सांगितलं.






