Sangli News : धक्कादायक ! वाढदिवसाला आईने नवीन मोबाईल न दिल्याने मुलाने उचलले ‘हे’ पाऊल

सांगली : सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणामुळे मुलाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. त्याने आपल्या आईकडे वाढदिवसाला नवीन मोबाईलची मागणी केली होती. मात्र आईने वाढदिवसाला मोबाईल न दिल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.
काय घडले नेमके?
काल सकाळी ५ च्या दरम्यान घराच्या टेरेसवर तो मृत अवस्थेत आढळून आला. या आत्महत्यने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. हा मुलगा ९ वीत शिकत होता. तो आई व इतर नातेवाईकांच्या सोबत मंगळवार पेठ येथे वास्तव्यास होता. तो एक उत्कृष्ट फुटबॉलपट्टू देखील होता. आणि पुढील आठवड्यात तो स्पर्धेसाठी परगावी जाणार होता. मात्र त्या अगोदरच त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला.
‘या’ कारणामुळे केली आत्महत्या
या मुलाचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस झाला होता. त्यावेळी त्याने आईकडे नवीन मोबाईल घेऊन द्यायची मागणी केली होती. त्याची आई एमआयडीसीत काम करायची. या कामातून कसंबलं त्याचं घर चालायच.त्यात मोबाईल घेऊन द्यायचं म्हणजे अवघड होतं.त्यामुळे कौटुंबिक परिस्थिती नसल्याने आईने त्यास नकार दिला होता. यामुळे मृत मुलगा नाराज झाला होता.
यानंतर त्याने शनिवारी मध्यरात्री आई आणि बहीण झोपी गेल्यावर तो घराच्या गच्चीवर गेला आणि त्याने सोलरसाठी उभा केलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मोबाईल न दिल्यामुळे मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.





