सांगली जिल्ह्यात खळबळ; उपसरपंच निवडणुक वादातून सदस्याचा खून
Updated On:

सांगली – सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात बोरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पांडुरंग काळे (वय-55) असे मृत ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.
पांडुरंग काळे हे शिवसेना पक्षाचे सदस्य होते अशी प्राथमिक माहिती आहे. माहितीनुसार, उपसरपंच निवडीवरूनच्या वादातून हा खून झाला आहे. यात अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे. पोलिसांकडून या घटनेप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत सदस्याचा खून झाल्यामुळे गावपातळीवर ग्रामपंचायतीमध्ये होणारं राजकारण हे कोणत्या पातळीवर पोहोचलंय हे बघायला मिळते.





