Sangli Lok Sabha 2024 Result : सांगलीत भाजपसह मविआला मोठा धक्का, अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा विजय…
Updated On:

Sangli Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. याचदरम्यान महाराष्ट्रातील सांगलीतून मोठी बातमी समोर येत आहे.याठिकाणी भाजपसह मविआला मोठा धक्का बसला आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील यांचा पराभव केला आहे.
काँग्रेस पक्षातर्फे विशाल पाटलांना सांगलीची जागा लढवायची होती. परंतु, जागावाटपात ही जागा शिवसेनच्या उद्धव ठाकरे गटाला गेल्यामुळे विशाल पाटलांनी बंड केले होते. सांगलीची जागा संपूर्ण देशात चर्चेत होती. कारण काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने विशाल पाटील या जागेवरून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते आणि अखेर याठिकाणी विशाल पाटील यांनी बाजी मारली आहे.





