लोणीकंद उपसरपंचपदी संगीता शिंदे बिनविरोध
Updated On:

वाघोली (प्रतिनिधी) : लोणीकंद तालुका हवेली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संगीता दिनेश शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार लोणीकंदचे ज्येष्ठ नेते श्रीमंत झूरुंगे व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वरिष्ठ सरचिटणीस प्रदीप वसंतराव कंद यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रुपेश गावडे, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा विजय वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.





