पुणे जिल्हा : कोयाळीचे सरपंच, उपसरपंच बिनविरोध

विकास भिवरे, उर्मिला कोळेकर यांची निवड
शेलपिंपळगाव – कोयाळी (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विकास साहेबराव भिवरे व उपसरपंचपदी उर्मिला मोहन कोळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून अजय टेंगले, अलका कोळेकर यांनी ठरल्याप्रमाणे अनुक्रमे सरपंच, उपसरपंचपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे या रिक्तपदांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी माणिक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली.
यावेळी दिलेल्या वेळेत सरपंचपदासाठी विकास भिवरे आणि उपसरपंचपदासाठी उर्मिला कोळेकर यांचा एक-एकच अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड पार पडली. बिनविरोध निवडीप्रसंगी पॅनल प्रमुख बाळासाहेब कोळेकर, बाळासाहेब कोळेकर, माजी सरपंच अजय टेंगले, सतीश भाडळे,
गणेश कोळेकर माजी उपसरपंच सुनिता पांढरे, अलका कोळेकर, वंदना दिघे, ग्रामपंचायत सदस्य राहुल आल्हाट, देविदास गायकवाड, रुपाली आल्हाट, ग्रामसेवक अनिल विघ्ने, तलाठी दिपाली कोठवळे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.





