घटस्फोटानंतर ‘संगीत देवबाभळी’ फेम अभिनेत्रीची नवी सुरुवात; केळवणाचा शेअर केला व्हिडिओ

Shubhangi Sadavarte | ‘संगीत देवबाभळी’ फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे. नुकतेच तिने होणाऱ्या पतीबरोबरचा केळवणाचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सप्टेंबर, २०२५ मध्ये प्रसिद्ध संगीतकार आनंद ओक यांनी शुभांगी सदावर्तेसोबत विभक्त होत असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. लग्नाच्या पाच वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र घटस्फोटानंतर शुभांगी आयुष्यात पुन्हा एकदा नवी सुरुवात करत आहे.
अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिच्या होणाऱ्या पतीचे नाव सुमित म्हशेळकर आहे. शुभांगी व सुमित यांच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांचं केळवण केलं. दोघांनीही या केळवणाचे सुंदर व्हिडीओ पोस्ट केले आहेत. ‘जुळली गाठ गं’ असं कॅप्शन शुभांगीने केळवणाच्या व्हिडीओला दिलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. Shubhangi Sadavarte |
View this post on Instagram
आनंद ओक यांची सोशल मीडियावर पोस्ट
दरम्यान, शुभांगी सदावर्ते हिचं हे दुसरं लग्न आहे. तिचं पहिलं लग्न संगीतकार आनंद ओक यांच्याशी झालं होतं. शुभांगी व आनंद यांनी २०२० मध्ये करोना काळात लग्नगाठ बांधली होती. पण पाच वर्षांच्या संसारानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये आनंद ओक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून घटस्फोटाची घोषणा केली होती. घटस्फोटाच्या घोषणेनंतर अवघ्या तीन महिन्यांत शुभांगीने दुसरं लग्न करत असल्याची बातमी शेअर केली आहे. Shubhangi Sadavarte |
शुभांगीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तिने ‘संगीत देवबाभळी’ या नाटकात आवलीची भूमिका केली आहे. तसेच ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमातही तिने काम केले आहे.
हेही वाचा:





