पिंपरी | धनविन स्पोर्ट्सला ‘संघर्ष नायक’ चषक

लोणावळा, (वार्ताहर) – जिल्हास्तरीय खुल्या क्रिकेट स्पर्धेत अलिबागच्या धनविन स्पोर्ट्स संघाने ‘संघर्ष नायक’ चषकावर आपले नाव कोरले. अटीतटीच्या अंतिम सामन्यात ‘धनविन स्पोर्ट्स’ने तळेगाव येथील दाभाडे इलेव्हन संघाचा ४६ धावांनी पराभव केला.
लोणावळा शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), शहराध्यक्ष कमलशील म्हस्के आणि सम्यक क्रांती फाउंडेशन यांच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत २४ संघाने सहभाग घेतला. अंतिम सामन्यात धनविन संघाने ८ षटकांमध्ये मध्ये १२२ धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना दाभाडे इलेव्हन संघास ७ गड्यांच्या मोबदल्यात ७४ धावाच करता आल्या. समर्थ कडू २२ चेंडूत ७६ धावा फटकावत सामनावीर ठरला. सनी बेनेसर याने मालिकावीराचा किताब पटकाविला.
तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड, तालुका सचिव अशोक सरवते, लोणावळा शहराध्यक्ष कमलशिल म्हस्के, मालन बनसोडे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, दिलीप दामोदरे, प्रमोद गायकवाड, नासीर शेख, निखिल कवीश्वर, नारायण पाळेकर, राष्ट्रवादी युवक आघाडी अध्यक्ष विनोद होगले, अंकुश सोनावणे, आनंद म्हस्के, विजय देसाई, सरपंच नागेश ओव्हाळ, संतोष कदम, संदीप शिंदे, चंद्रकांत गायकवाड, महिंद्रा देसाई, जयराम कदम, चंद्रकांत कांबळे, मोहन जगताप, नंदू शेळके, अमोल भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.





