Sanchita Ugale : अभिनेत्री संचिता उगलेच्या आयुष्यातील ‘ही’ महत्वाची गोष्ट अखेर समोर आलीच; धक्कादायक वळण येणार?
टेलिव्हिजनसोबतच संचिता मोठ्या पडद्यावरही झळकली होती. विकी कौशल अभिनीत छावा या चित्रपटात तिने ताराराणींची महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच सायलन्स २: द नाईट आउल बार शूटआउट या चित्रपटातही ती झळकली होती.

Sanchita Ugale : कुमकुम भाग्य आणि वागळे की दुनिया यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली २२ वर्षीय टेलिव्हिजन अभिनेत्री संचिता उगले हिने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील आपल्या राहत्या घरी कथितपणे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास नालासोपारा परिसरातील घरात कोणीही नसताना संचिताने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली. घटनास्थळी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, तसेच कोणतीही सुसाईड नोट देखील जप्त करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संचिता आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत नालासोपारा येथे राहत होती. रविवारी सायंकाळी ही घटना घडल्याचे सांगितले जात असून त्या वेळी ती घरी एकटीच होती.
कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
टेलिव्हिजनसोबतच संचिता मोठ्या पडद्यावरही झळकली होती. विकी कौशल अभिनीत छावा या चित्रपटात तिने ताराराणींची महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच सायलन्स २: द नाईट आउल बार शूटआउट या चित्रपटातही ती झळकली होती.
अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ती सातत्याने प्रयत्नशील होती. संचिता ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने शून्यातून आपली कारकीर्द सूरु केली.
या शोसाठी तिचे मानधन दररोज ५०,००० ते १ लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज वर्तवला जात असला, तरी तिची नेमकी एकूण संपत्ती (नेट वर्थ) सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाही. संचिता सोशल मीडियावरही सक्रिय होती.
संचिताच्या वडिलांनी अचोले पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्यांना या घटनेत कोणताही संशयास्पद प्रकार वाटत नाही किंवा या मृत्यूसाठी ते कोणालाही जबाबदार धरत नाहीत, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून, सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करून या टोकाच्या पाऊलामागचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.






