सना खान दुसऱ्यांदा झाली आई; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

Sana Khan | बॉलिवूड अभिनेत्री सना खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. सनाला दिड वर्षांचा एक मुलगा आहे. आता तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
सना खानने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लिहिलं की, ‘आमच्या छोट्या राजपुत्राची आमच्या आयुष्यात येण्याची ही सुंदर बातमी तुमच्यासोबत शेअर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्याकडे जे आहे त्यासाठी अलहमदुलिल्लाह. आम्ही आनंदी आहोत. मोठा भाऊ तारिक जमील ५ जानेवारी २०२५ रोजी जन्मलेल्या त्याच्या धाकट्या भावाचं स्वागत करतोय.’ व्हिडिओसोबत सनाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘जेव्हा वेळ येते, अल्लाह सर्व देतो आणि जेव्हा देतो तेव्हा तो भरभरून देतो.’ Sana Khan |
View this post on Instagram
सना खान २०२३ मध्ये पहिल्यांदा झाली आई
दरम्यान, सना खान आणि तिचा पती अनस सईद यांनी ५ जुलै २०२३ रोजी त्यांचा पहिला मुलगा तारिक जमीलचं स्वागत केलं. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी सना खानने सोशल मीडियावर तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. त्यानंतर आता तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. Sana Khan |
सना खानच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ती ‘बिग बॉस ९’मध्ये दिसली होती. या शोमध्ये तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर सनाने काही चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र २०२० मध्ये तिने धर्मासाठी ग्लॅमर इंडस्ट्री सोडली. परंतु बॉलीवूडच्या अनेक इव्हेंटमध्ये ती पतीसोबत हजेरी लावताना दिसते.
हेही वाचा:
मोठी बातमी ! HMPV व्हायरसची राज्यात एन्ट्री ; नागपुरातील दोन लहान मुलांना बाधा





