SKM : बळीराजाचा पुन्हा एल्गार; 20 मार्चला संसदेबाहेर ‘किसान महापंचायत’

नवी दिल्ली – देशभरातील बळीराजा पुन्हा एकदा एल्गार करण्याच्या तयारीत आहे. किमान आधारभूत किमतीच्या अनुषंगाने हमीभावाचा कायदा करण्याची मागणी करत 20 मार्च रोजी संसदेसमोर “किसान महापंचायत’ आयोजित करण्यात आली आहे.
“संयुक्त किसान मोर्चा’ शेतकरी संघटनेची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत युधवीर सिंह, राजा रामसिंह आणि डॉ. सुनील यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी संघटनांनी विविध विषयावर चर्चा केली.
कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शेतकरी संघटनेने किमान आधारभूत किमतीच्या अनुषंगाने हमीभावाचा कायदा करण्याची मागणी सातत्याने केली आहे. बैठकीत संयुक्त किसान मोर्चाने सर्वसाधारण अर्थसंकल्पावर टीका करत यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकरी विरोधी असल्याचे म्हटले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/rs-51749-crore-have-been-authorised-under-the-governments-ayushman-bharat-health-insurance-scheme-till-february-2-this-year-union-health-minister-mansukh-mandaviya-informed-lok-sabha-on-friday/
अर्थसंकल्पात शेतकरी, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आणि मनरेगा यांच्याशी संबंधित वाटपात कपात केल्याबद्दल मोदी सरकारचा निषेध केला आहे.





