Samruddhi Mahamarg Bus Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; 12 जणांचा मृत्यू, 23 जखमी

Samruddhi Mahamarg Bus Accident : समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून सतत अपघाताच्या घटना घडत आहे. समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा सापळा होत आहे की काय हा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर अपघात झाला असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 6 वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. तर 23 जण जखमी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाका भागातील समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाका येथे ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या टेम्पो ट्रॅव्हरलमध्ये एकूण 35 प्रवासी होते. या टेम्पो ट्रॅव्हलरने प्रवास करणारे सर्व प्रवासी हे नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रवासी बुलढाण्यातील बाबा सैलानींच्या दर्शनाला गेले होते. तिथून घरी परतत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.
पंतप्रधानांकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर
या घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली केली आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदींनी ट्विट करत लिहिले की, “अपघाताच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमी रुग्ण लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.”
Pained by the loss of lives due to an accident in Chhatrapati Sambhajinagar district. My thoughts are with those who lost their loved ones. I wish the injured a speedy recovery. An ex-grata of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured…
— PMO India (@PMOIndia) October 15, 2023
या अपघतानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याबाबत त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “समृद्धी महामार्गावरील रात्री झालेल्या अपघातात आतापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात एका चिमुकिलीचा समावेश आहे. घटना अत्यंत दुःखद आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे हलवण्यात आले आहे. समृद्धीवर होणाऱ्या अपघातांची मालिका अजूनही सुरुच आहे. मृतातम्यांना श्रद्धांजली. तातडीने जाऊन अपघातस्थळाची आणि वाहनांची पाहणी केली.”
समृद्धी महामार्गावरील रात्री झालेल्या अपघातात आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. यात एका चिमुकिलीचा समावेश आहे. घटना अत्यंत दुःखद आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे हलवण्यात आले आहे. समृद्धीवर होणाऱ्या अपघातांची मालिका अजूनही सुरुच आहे. मृतातम्यांना श्रद्धांजली.… pic.twitter.com/njlNWESNrm
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 15, 2023





