समृद्धी केळकर नव्या भूमिकेत; मालिकेचा प्रोमो समोर…

Samruddhi Kelkar | स्टार प्रवाह वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ असे या या मालिकेचे नाव आहे. अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर ही नवी जोडी या मालिकेच्या निमित्ताने एकत्र येणार आहे. स्टार प्रवाहने नुकताच नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.
‘ती अस्सल गावरान, तो पक्का शहरी…येत आहेत भेटायला…’ असं कॅप्शन या प्रोमो दिले आहे. स्वाभिमानी आणि कष्टाळू असलेल्या कृष्णाचं (समृद्धी) आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम आहे. लहान वयात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आल्यामुळे तिला परिस्थितीची जाणीव असते.
समृद्धी केळकर कृष्णा या पात्राविषयी सांगताना म्हणाली, ‘दोन अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात येताना अतिशय आनंद होत आहे. या भूमिकेविषयी ऐकताच ती मला क्षणात भावली. कृष्णाच्या निमित्ताने खूप गोष्टी नव्याने शिकता येणार आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. कीर्ती खूप शिकलेली, स्वत:च्या मतावर ठाम आणि सर्वांना सांभाळून घेणारी होती. कृष्णा थोडी वेगळी आहे. कोल्हापुरच्या मातीत ती वाढली आहे. शिकलेली नसली तरी शेतीचं ज्ञान अवगत असणारी आहे या मालिकेत माझा लूकपण पूर्णपणे वेगळा आहे’
‘मन धागा धागा जोडते’ नवा मालिकेनंतर अभिनेता अभिषेक रहाळकर पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत तो दुष्यंत हे पात्र साकारणार आहे. खेड्याविषयी कमालीचा तिटकारा असलेला दुष्यंत आहे. अभिषेक रहाळकर देखील या नव्या मालिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. Samruddhi Kelkar |
समृद्धीने याआधी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘या फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमध्ये काम केलं होतं. ज्यातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. Samruddhi Kelkar |
हेही वाचा:
शेअर बाजारात तेजी ! सेन्सेक्स-निफ्टी वधारले ; ‘या’ बँकिंग शेअर्समध्ये उसळी





