आपल्याला व पत्नीला सतत धमक्या येत असल्याचा समीर वानखेडेंचा दावा

मुंबई – गेल्या चार दिवसांपासून आपल्याला व आपल्या पत्नीला सतत धमक्या येत असल्याचा आरोप मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ऑफ इंडियाचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी केला आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर या सिने अभिनेत्री आहेत. वानखेडे म्हणाले की सोशल मिडीयावरही आपल्याला अश्लील मेसेज येत आहेत.
या प्रकरणी आपण मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून पोलिस संरक्षण मागणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. अभिनेता शाहरूख खान याच्याकडे 25 कोटी रूपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची या प्रकरणी सीबीआय मार्फत चौकशी सुरू आहे.
वानखेडे यांच्याकडे उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती असल्याचीहीं सध्या चौकशी सुरू आहे. आपली चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याला वानखेडे यांनी धमकावण्याचाहीं प्रयत्न केल्याची बाब सध्या समोर आली आहे.





